महा संवाद | नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवर विविध देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने नवी मुंबईतील काही भागांचा पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार आहे.
महापालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.या कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
याशिवाय सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यतापाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीनंतरही बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे.
नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी यासंदर्भात सार्वजनिक आवाहन जारी केले आहे.
स्रोत : नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत Instagram खाते — @nmmconline
📰 महा संवाद | तुमच्या परिसराची, तुमच्या आवाजाची बातमी













Leave a Reply