देवधाबा गावातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी CCTV कॅमेरे व पथदिव्यांची मागणी

स्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन

मलकापूर तालुका | प्रतिनिधी

मलकापूर तालुक्यातील देवधाबा गावात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत आणि आवश्यक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी, या मागणीसाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले.

गावातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. गावातील प्रमुख चौक, रस्ते व संवेदनशील ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे, बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन पथदिवे बसवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

ग्रामपंचायत प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

संघटनेच्या वतीने निवेदन

स्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कृष्णा सावळे यांच्या नेतृत्वाखाली सचिन सिरसाट, मनोज भोजने, प्रशिक मोरे, विजय सावळे, वैभव वाघ व नाना शिवदे तसेच ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच मा. देवकुमार सोळंके तसेच ग्रामपंचायत कर्मचारी धनराज सुरडकर, सचिन कवळे व गुमानशिंग सोळंके यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

देवधाबा गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *