शिक्षक दिनानिमित्त आयोजित नॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर:
नशामुक्ती केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे यांना यावर्षीचा अत्यंत मानाचा *नॅशनल आयकॉन पुरस्कार 2026* प्रदान करण्यात आला व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने . शिक्षक दिन व दैनिक समीकरण च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2026 पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात हा सोहळा पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशांतभाई वानखेडे शिक्षण सभापती होते मुख्य अतिथी म्हणून धनश्रीताई काटीकर पाटील हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष, प्रा. अनिल खर्चे प्राचार्य वी भी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय कॉलेज उपस्थित होते, प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर सर्व शिक्षकांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा विशेष शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अशांत भाई वानखेडे शिक्षण सभापती
म्हणाले, “शिक्षक हे समाजाचा कणा असतात. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देऊन एक सुजाण नागरिक घडवतात.”
विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणसिंग सिरसवाल यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल केसकर सर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी मानले. राष्ट्रगीताणे कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply